Mumbai News: विनाकारण पाच जणांवर चाकूने हल्ला, आरोपीवर गुन्हा दाखल, साकीनाका येथील घटना
Sankinaka PC TWITTER

Mumbai News: मुंबईतील साकी नाका परिसरात एका व्यक्तीने विनाकारण पाच जणांवर  चाकूने वार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही घटना गुरुवारी 9.45 वाजता जरिमरी परिसरात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हल्लेच्या घटनेनंतर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून घेतला आहे. हेही वाचा-  कुलाबा येथे काश्मिरी व्यावसायिकाला टोळक्याकडून बेदम मारहाण,

मिळालेल्या माहितीनुसार,  जरिमरी परिसरात घडलेल्या घटनेत सिद्धेश प्रकाश घोरपडे (23), राजेश तंगराज चेट्टीयार (28), तंगराज चेट्टियार (58), लक्ष्मी चेट्टीयार (52) आणि विक्की (30) यांना गंभीर समावेश आहे. लक्ष्मी चेट्टियार यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेले सर्वजण जरीमरी येथील आंबेडकर नगर भागातील रहिवासी आहेत.

पोलिसांनी आरोपीची देखील ओळख पटवली आहे. इंकलाब खान असं हल्लेखोरांचे नाव आहे. इंकलाब याने पाच जणांवर जीवघेणा हल्ला केला. खान यांच्यावर ड्रग्जशी संबंधित गुन्ह्यांसह अनेक आरोप आहेत. आरोपीने स्वत:ला देखील जखमी केले आहे. आरोपी देखील रुग्णालयात उपचारासाठी आहे. या घटनेनंतर जखमी झालेल्या पाच जणांच्या कुटुंबियांनी आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी आरोपींविरुध्दात जीवघेणा हल्ला( भादंवि कलम 307 अंतर्गत) खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांची पुढील कारवाई सुरु आहे.