केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज कोरोनावर (Coronavirus) मात केली असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. नितीन गडकरी यांनी स्वत: ट्वीटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. नितीन गडकरी हे कोरोनामुक्त झाल्याचे कळताच त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नितीन गडकरी यांना गेल्या दोन आठवड्यापूर्वी अशक्तपणा जणावत असल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यावेळी त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते.
नितीन गडकरी यांना 16 सप्टेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. यामुळे त्यांनी स्वत:चे विलगीकरण केले होते. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर नितीन गडकरी यांनी आज पुन्हा ट्विट करत कोरोनामुक्त झाल्याची माहिती दिली आहे. "आपणांस मला हे सांगताना आनंद होत आहे की, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या बळावर मी कोरोनामधून पूर्णपणे बरा झालो आहे” अशा आशयाचे ट्विट स्वत: नितीन गडकरी यांनी केले आहे. हे देखील वाचा-No Mask, No Entry: मुंबईमध्ये मास्क नसल्यास सार्वजनिक परिवहन बसेस, टॅक्सी आणि रिक्षांमध्ये प्रवेश नाही- BMC
नितीन गडकरी यांचे ट्विट-
मुझे आप सभी को यह बताते हुए बहुत प्रसन्नता हो रही है कि आप सभी के आशीर्वाद और शुभकामनाओं के बल पर मैं कोरोना से ठीक हो चुका हूं। आपके स्नेह के लिए धन्यवाद।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 30, 2020
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट आणखी गडद होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 13 लाख 66 हजार 129 वर पोहचली आहे. यापैकी 36 हजार 183 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 लाख 69 हजार 159 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 2 लाख 60 हजार 363 रुग्णांवर उपचार सुरु आहे.