Amit Shah Visits Siddhivinayak Ganpati Temple in Mumbai (Photo Credits: ANI)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसर्‍या टप्पाच्या समारोपासाठी सध्या मुंबईत दाखल झालेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  (Amit Shah) यांनी आज सिद्धिविनायक मंदिरात  (Siddhivinayak Ganapati Temple) मध्ये आले. काही वेळापूर्वी त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले आहे. या वेळेस अमित शहा यांच्यासोबत भाजप नेते आणि महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार देखील उपस्थित होते. आज महाराष्ट्रासह देशभरात गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जात आहे. थोड्याच वेळात शहा लालबागच्या राजाच्या दर्शनाही जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रा समारोपासाठी सोलापूरमध्ये दाखल झालेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आज मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत आज केवळ गणेशोत्सवाचा भाग म्हणून शहा काही गणपतींचे दर्शन घेणार आहेत. काही भाजपा नेत्यांच्या घरी देखील ते भेट देणार आहेत. Ganesh Chaturthi 2019: सिद्धिविनायक, लालबागचा राजा, GSB सह मुंबईत गणेशोत्सवाला सुरूवात; पहिल्या दिवसापासून भाविकांची दर्शनाला गर्दी

ANI Tweet 

महाराष्ट्रात लवकरच आगामी विधानसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजप नेते, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. येत्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपामध्ये अनेक मोठे नेते प्रवेश करण्याची शक्यता आहे.