UNESCO World Heritage List 2024-25:  युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी मराठा सम्राज्याशी संबंधित गड किल्ल्यांचं भारताकडून नामांकन
युनेस्को जागतिक वारसा यादी | PC: X

भारत सरकार कडून यंदाच्या युनेस्कोच्या 2024-25 (UNESCO World Heritage List 2024-25)  या जागतिक वारसा यादीसाठी मराठा सम्राज्याशी संबंधित गड किल्ल्यांचं नामांकन दिलं आहे. यामध्ये 12 स्थळांमध्ये साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश आहे. हे किल्ले भौगोलिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत.

हिंदवी स्वराज्यामध्ये त्याचा मोलाचा वाटा होता. हे किल्ले 17-19 च्या शतकातील आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगांपासून ते कोकणच्या किनाऱ्यापर्यंत आणि दख्खनच्या पठारापासून पूर्व घाटापर्यंत शिवरायांनी गड किल्ल्यांचे जाळ निर्माण केले आहे. महाराष्ट्रात एकूण 390 किल्ले आहेत. परंतु मराठा मिलिटरी लँडस्केप अंतर्गत केवळ 12 जणांची निवड झाली आहे. नक्की वाचा: राज्यातील गड-किल्ल्यांची पावित्र्य अबाधित राहणार; स्वच्छता व संवर्धनासाठी सरकार देणार तीन टक्के निधी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा .

पहा ट्वीट

12 पैकी 8 भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित आहेत. शिवनेरी किल्ला, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजी किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडे आहे तर साल्हेर किल्ला, राजगड, खांदेरी आणि प्रतापगड हे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाद्वारे व्यवस्थापित केले जातात.