Crime News | Pixabay.com

महाराष्ट्रातील ठाणे( Thane)  जिल्ह्यात उल्हासनगर (Ulhasnagar)  मध्ये आपल्या  तीन वर्षांच्या भाचीची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी गुरुवारी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील उल्हासनगर येथील प्रेम नगर येथील घराजवळून 18 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झालेली मुलगी गुरुवारी मृतावस्थेत आढळून आली. चौकशीदरम्यान, 30 वर्षीय आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली पण त्याने तिला जाणून बुजून मारले नसल्याचा दावा केला.

आरोपीच्या दाव्यानुसार, तो भाचीसोबत खेळत होता. त्याने तिला थप्पड मारली आणि ती किचन मध्ये स्लॅबवर आदळली आणि त्यामध्ये मृत्यू झाला. भाचीला मृताव्यस्थेमध्ये पाहून तो घाबरला आणि त्याने मुलीचा मृतदेह जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. नंतर मृतदेह झुडपात फेकून दिला.

पोलिसांनी सध्या चिमुकलीचा मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवला आहे. या पोस्टमार्टमच्या अहवालात तिचा मृत्यू कशाने झाला याचा उलगडा होणार आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प 5 मधील हिललाईन पोलीस स्टेशनच्या परिसरामधील आहे.  चार दिवस ही मुलगी बेपत्ता होती.  मुलीच्या आईने पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे.

स्थानिक नागरिकांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले असून या प्रकरणाची गंभीर चौकशी करण्याची मागणी केली आहे. परिसरातील सुरक्षा व्यवस्था मजबूत करून मुलांच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मुलीच्या मृत्यूचे खरे कारण लवकरच कळेल आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे. Badlapur Adarsh School Sexual Assault Case: आदर्श विद्यालय बदलापूर मध्ये मुलींसोबत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी SIT स्थापन, शाळेविरूद्ध कारवाईचे CM Eknath Shinde यांचे आदेश .

काही दिवसांपूर्वी बदलापूर मध्ये चिमुकलींवर शाळेत अत्याचाराची घटना ताजी असताना आता ही अजून एक बाल अत्याचाराची  घटना समोर आली आहे.