Supriya Sule | Twitter

उजणी धरण (Ujani Dam) परिसरात बोट उलटून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. दुर्घटना घडल्यापासून या सहा जणांचा शोध स्थानिक प्रशासनाकडून घेतला जात होता. प्रदीर्घ काळ शोध मोहीम राबवूनही सहा जणांचा शोध न लागल्याेन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला पाचारण करण्यात आले होते. अखेर एनडीआरएफ जवानांना घटना घडल्याच्या तिसऱ्या दिवशी या सहाही जणांचे मृतदेह आढळून आले. या घटनेनंतर उजणी धरण परिसरात सुरु असलेली बेकायदेशीर जलवाहतूक (Illegal Water Traffic) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही याबाबत मुद्दा उपस्थित केला आहे. सोशल मीडिया मंच X पोस्टमध्ये त्यांनी बेकायदेशीर जलवाहतूकीचा मुद्दा उपस्थित केला आहे.

सुप्रिया सुळे एक्स पोस्ट

उजनी धरण क्षेत्रात झालेल्या दुर्घटनेवरुन सुरक्षेच्या दृष्टीने मुद्दा उपस्थित करताना सुप्रिया सुळे यांनी एक्स पोस्टद्वारे म्हटले आहे की, 'कळाशी, ता. इंदापूर येथील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात लॉन्च उलटून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये कृष्णा जाधव, कोमल जाधव, शुभम, माही, अनुराग अवघडे आणि गौरव डोंगरे यांचा समावेश आहे. हि अतिशय दुःखद घटना आहे. या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. माझी प्रशासनाला विनंती आहे की कृपया या भागातील बेकायदा प्रवासी जलवाहतूक थांबविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्या.' (हेही वाचा, Boat Capsized in Ujani Dam: उजनी धरणात बोट उलटून मोठी दुर्घटना, 6 जण बुडाले; एनडीआरएफकडून शोध मोहिम सुरू)

नातेवाइकांच्या हंबरड्याने उजणी धरणकाठ गहीवरला

प्राप्त माहितीनुसार, एनडीआरएफ दलाच्या जवानांना पाच जणांचे मृतदेह एकापाठोपाठ आढळून आले. तर सहव्या व्यक्तीता मृतदेह थोडा उशीरा सापडला. या सर्वांचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला. मृतदेहांचा शोध घेतला जात असताना उजनी धरण काठावरील दृश्य अत्यंत करुण होते. पाचही मृतांचे नातेवाईक धरणाच्या काठावर बसून होते. बेपत्ता लोक जीवंत सापडतात की मृत याबाबत त्यांना कोणतीच खातरजमा नव्हती. अखेर धाकधूक वाढली आणि सर्वांच मृतदेह हाती आले. त्यानंतर उपस्थित नातेवाइकांच्या हंबरड्याने उजणी धरणकाठ गहीवरुण गेला. (हेही वाचा, Boat Capsized in Ujani Dam: उजनी धरणात बुडालेल्या ५ जणांचे मृतदेह सापडले, एक बेपत्ता; शोध मोहिम सुरू)

मृतांची नावे

या दुर्घटनेतील गोकुळ दत्तात्रय जाधव (वय- 30), कोमल गोकुळ जाधव ( वय- 25), माही गोकुळ जाधव (वय-3), शुभम गोकुळ जाधव (वय 18 महिने, सर्व रा. झरे ता. करमाळा), अनुराग ज्ञानदेव अवघडे (वय 26), गौरव धनंजय डोंगरे (वय-24 रा. कुगाव ता. करमाळा) यांचा शोध लागला असून सहाही जण मृत्युमुखी पडले आहेत.

एक्स पोस्ट

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे वीज जवान तीन बोटींच्या सहाय्याने शोध घेत होते. या शोधादरम्यान त्यांना धरणातील पाण्यात तळाला एका बोट सापडली. ही बोट उलटल्याने बुडाली होती. बोटीमध्ये एक मोटारसायकली होती. दरम्यान, काही मच्छिमारांच्या होड्याही एनडीआरएफ जवानांना मदत करत होत्या. एनडीआरएफ जवान आणि स्थानिक मच्छिमार यांच्या अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सर्वांचे मृतदेह आढळून आले. या दुर्घटनेनंतर उजनी धरणात होत असलेल्या बेकायदेशीर जलवाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोलापूर पोलिसांनी सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी करमाळा ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे. उत्तरीय तपासणीझाल्यानंतर हे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.