मराठा समाजास 10% आरक्षण देण्याचा प्रस्ताव राज्य विधिमंडळाने एकमताने मंजूर केला. राज्य सरकारच्या या प्रस्तावाबद्दल राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकार आणि मराठा समाजाचे अभिनंदन केले आहे. हे आरक्षण कोर्टातही टीकेल अशी मला आशा आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या हेतूवर सध्यातरी आपल्याला शंका नाही. मात्र, त्यासाठी अनेकांना बलिदान द्यावं लागलं हेसुद्धा विसरता येणार नाही, असेही ठाकरे म्हणाले. मराठा आरक्षण (Maratha Reservation) सरकारने मंजूर करावे यासाठी मराठा समाजास मोठे आंदोलन करावे लागले. मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसले तेव्हा त्यांच्यासोबत उपोषणालाबसलेल्या अनेकांवर अमानुष लाठीचार्ज झाला. टोकी फुटली, अनेकांवर गुन्हे दाखल झाले हे सगळं व्हायला नको होतं. पण इतके सगळे झाल्यावर तरी समाजाला आरक्षण भेटले. त्यासोबत इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणास धक्का न लावता हे आरक्षण देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले, याबाबत त्यांचेही अभिनंदन असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबद्दलही कौतुकोद्गार काढले.
कायद्याच्या कसोटीवर हे आरक्षण टीकावं
कायद्याच्या कसोटीवर मराठा आरक्षण टीकावं आणि समजाला शिक्षण आणि नोकरीमध्येही ते मिळावं अशी आपेक्षा आहे. राज्य सरकारने समाजातील किती लोकांना या आरक्षणामुळे नोकऱ्या मिळती आणि त्या कुठे मिळतील हे सुद्धा जाहीर करावे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. दरम्यान, मराठा आरक्षणावरुन महाविकासआघाडीमध्ये कोणत्याही प्रकारे दुमत नाही. आम्ही सर्वांनी मिळून आरक्षणास मान्यता दिली आहे. राज्य सरकारने आरक्षणाची हमी घेली आहे. अर्थात हा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर झाला आहे. असे असले तरी त्याबाबत मी अत्ताच फार काही बोलणार नाही. कारण काही बोलून मला उगाच संशय निर्माण करायचा नाही. राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर कोण आहे. त्यांचा इतिहास काय आहे ते सर्वांना माहिती आहे. त्यामुळे मी इतकेच म्हणेन की, आरक्षणानुसार समाजातील किती लोकांना आणि कोणत्या ठिकाणी रोजगार मिळेल हे सुद्धा सरकारने स्पष्ट करावे. (हेही वाचा, Manoj Jarange Patil on Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, '10% मराठा आरक्षण देऊन सरकारने फसवणूक केली')
भाजप, शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
दरम्यान, आरक्षणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर भाजप, शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी गुलाल उधळला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुळे, गिरीश महाजन, शिंदे गटातील आमदार भरत गोगावले आणि इतरही अनेक आमदार गुलालांच्या उधळणी रंगलेले पाहायला मिळाले. काही ठिकाणी तर या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे वाजवून आनंद साजरा केल्याचेही पाहायला मिळाले.