Shivsena MLA Disqualification Case: सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) गुरुवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (यूबीटी) सुप्रिमो उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या याचिकेवर 8 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने प्रतिवादींना 1 एप्रिल किंवा त्यापूर्वी उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिल्याने उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
आता या प्रकरणावर 8 एप्रिल रोजी सुनावणी होणार असून मुख्यमंत्री शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर 1 एप्रिल किंवा त्यापूर्वी उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिंदे गटाकडून अॅड. मुकुल रोहोतगी, हरीश साळवे, महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली. तसेच उद्धव ठाकरे गटाकडून अॅड. कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. (हेही वाचा -Shiv Sena MLA Disqualification Case: उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा; पक्षाचे 14 आमदार पात्र, विधानसभा अध्यक्ष Rahul Narvekar यांची निकालात माहिती)
उद्धव ठाकरे यांनी सभापती राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असून त्यात शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हटले आहे. सभापती राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 22 जानेवारी रोजी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या गटातील इतर खासदारांना नोटीस बजावली होती. (हेही वाचा - Shiv Sena MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट, काय घडलं सुनावणी वेळी?)
#SupremeCourt to hear shortly the petition filed by ShivSena (Uddhav Balasaheb Thackeray) challenging #Maharashtra Speaker's refusal to disqualify MLAs of #EknathShinde group.
A bench led by CJI DY Chandrachud will hear.#ShivSena #UddhavThackeray #SupremeCourtofIndia pic.twitter.com/B8L7vGMlkK
— Live Law (@LiveLawIndia) March 7, 2024
दरम्यान, 10 जानेवारी रोजी झालेल्या निर्णयात, सभापतींनी शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवणारी ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावली होती. तसेच शिंदे गटालाच खरी शिवसेना असे म्हटले होते.