Uddhav Thackeray Vidarbha Tour Schedule: पक्षात झालेल्या फुटीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे प्रचंड सक्रीय झाले आहेत. पवार यांनी नुकताच नाशिक दौरा करुन येवला येथील सभा गाजवली. तर उद्धव ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर आहेत. आपल्या संबंध दौऱ्यात ते जनतेशी संवाद साधणार आहेत. ते दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात यवतमाळ येथून होणार आहे. उद्धव ठाकरे हे दैऱ्याच्या पहिल्या टप्प्यात यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला आणि नागपूर या पाच जिल्ह्यांतील जनतेशी संवाद साधून आढावा घेतील. या दौऱ्यात ते शिवसेना (UBT) पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा करतील. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातूनही उद्धव ठाकरे हे आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना देण्याची शक्यता आहे.
विदर्भात पोहोचल्यावर उद्धव ठाकरे हे दारव्हा-दिग्रस येथे जाऊन पोहरादेवीचे दर्शन घेणार आहेत. पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यास औपचारिकपणे सुरुवात होईल. साधारण दुपारी 2 वाजणेच्या सुमारास ठाकरे दारव्हा दिग्रस येथे पोहोचतील. या दौऱ्यात ते आमदार संजय राठोड यांचा जोरदार समाचार घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
उद्धव ठाकरे विदर्भ दौरा वेळापक्षक
आज 9 जुलैचा दौरा
दुपारी दोनच्या सुमारास ते पोहरादेवीचे दर्शन घेतील. त्यानंतर दुपारी तीन वाजणेच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. त्यानंतर 3.30 च्या सुमारास ते वाशीमच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. तर सायंकाळी चार वाजता यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी स्वतंत्र संयुक्त संवाद साधतील.
उद्या 10 जुलैचा दौरा
अमरावती जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत सकाळी 11 वाता चर्चा, त्यानंतर साडेआकरावासाजता अकोला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा, त्यानंतर दुपारी एक वाजता अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत संवाद. सायंकाळी सह वाजता पुन्हा एकादा नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद. हा संवाद नागपूर येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात होईल.