Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

रज्याचे माजी मुंख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षाचे सर्वोच्च नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज रत्नागिरी दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी बारसू रिफायनरी ( Barsu Refinery Project) प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नागरिकांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाला असलेल्या विरोधापाठिमागची जनभावना जाणून घेतली. त्यानंर प्रसारमाध्यमांशी बलताना स्पष्ट भूमिकाही व्यक्त केली. या वेळी प्रकल्प विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोणताही प्रकल्प स्थानिक नागरिकांची भावना विचारात घेऊनच राबवला जावा. लोकांचा विरोध असेल अथवा लोकांचे मुडदे पाडून जर प्रकल्प रेटला जात असेल तर त्याला आमचा तीव्र विरोध असेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

रिफायनरी प्रकल्प रेटण्यासाठी लोकांचे मुडदे पाडण्याचा, डोकी फोडण्याचा डाव आखला जात आहे. पण, आम्ही लोकांची डोकी फोडून, मुडदे पाडून विकास काय कामाचा. आमचा त्याला विरोध असेल. अशा प्रकारचा विकास आम्ही होऊ देणार नाही. इथे मी 'मन की बात' करण्यासाठी आलो नाही. ज्यांना रिफायनरीचे समर्थन करायचे आहे त्यांनी तो करुन दाखवा, असे स्पष्ट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे. (हेही वाचा, उद्धव ठाकरे यांचा आज रत्नागिरी दौरा, घेणार बारसू रिफायनरी विरोधकांची घेणार भेट; राजापूर येथे समर्थकांकडून मोर्चाचे आयोजन)

ट्विट

उद्धव ठाकरे यांनी विद्यमान राज्य सरकार आणि रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थकांवर जोरदार टीकास्त्र सोडताना सांगितले की,तुम्हाला हवे तर रिफायनरी प्रकल्प गुजरातला खुशाल घेऊन जावा आणि आमचा अर बस, वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात परत मिळवून द्या. चांगले प्रकल्प गुजरातला दान करायचे आणि वादग्रस्त, प्रदुषणकारी प्रकल्प महाराष्ट्राला द्यायचे हे आम्ही चालू देणारन नाही. प्रकल्प रेटण्यासाठी जर हुकुमशाहीचा विचार कराल तर ती हुकुमशाही आपण मोडीत काढू असेही उद्धव ठाकरे म्हणाले.