 
                                                                 Uddhav Thackeray Dasara Melava 2024: मुंबईत आज दोन दसरा मेळावा पार पडत असून दोन्ही शिवसेनेच्या गटाकडून एकमेंकांवर जोरदार टीका होत असल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान शिवसेना पक्षाने महायुती सरकारवर जोरदार टीका केली. भाजपला आता राजकारणातून खांदा देण्याची वेळ आली आहे, ही वृत्ती संपवावी लागेल, यांचा शिरच्छेदच करावा लागेल, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला आहे. शिवतीर्थावरून दसरा मेळाव्याला संबोधित करताना भाजपवर त्यांनी जोरदार टीका केली. (हेही वाचा - Dasara Melava 2024: अदानींचे सर्व जीआर निघेपर्यंत राज्यात आचारसंहिता लागणार नाही; दसऱ्या मेळाव्यात आदित्य ठाकरेंची महायुती सरकारवर टिका )
भाजप केवळ मतांसाठी शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला आणि तो पाडला. आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार आहे. ते आपलं दैवत आहे. प्रत्येक राज्यात शिवाजी महाराज यांचा मंदिर उभारल गेलं पाहिजे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवाजी महाराज हे मतं मिळणारे यंत्र नाही, ते ईव्हीएम मशीन नाही. जो शिवाजी महाराज मंदिराला विरोध करेल त्याला महाराष्ट्र माफ करणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
बाळासाहेबांचा विचार हा तुझा विचार नाही. हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण अशी जाहिरात मिंध्यांनी दिली आहे. त्याला सांगा पुढच्या दोन ओळी राहिल्या. हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, अदाणी आमची जान आणि आम्ही शेठजींचे श्वान या ओळी राहिल्या. अशी बोचरी टीका यावेळी ठाकरेंनी केली आहे. आपण टाटांचंही श्वान प्रेम पाहिलं मी देखील कुत्र्यांवर प्रेम करतो. मी श्वानप्रेमी आहे, पण मी लांडगा प्रेमी नाही. हे सगळे लांडगे आहेत. वाघाचं कातडं पांघरण्याचा प्रयत्न करत आहेत. पण चाललं आहे असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
