Uddhav Thackeray (Photo Credit: X/ANI)

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हा आमचा श्वास आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राज्यकारभार करणे हा आमचा ध्यास आहे. म्हणूनच महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार सत्तेत आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपतींचे शिवाजी महाराज यांचे मंदिर (Temple) उभारणार आहोत. इतकेच नव्हे तर शक्य झाल्यास सूरत येथेही महाराजांचे मंदिर उभारु, असे घोषणा उद्धव ठाकरे () यांनी केली आहे. ते कोल्हापूर येथून शिवसेना (UBT) आणि महाविकासआघाडीचे उमेदवार के पी पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला.

भ्रष्ट सरकारला जनता माफ करणार नाही

उद्धव ठाकरे यांनी विद्यमान राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधत म्हटले की, हे सरकार केवळ अदानींचा विकास करण्यासाठी काम करत आहे. महाराष्ट्र लूटत आहे, ओरबडत आहे आणि अदानी आणि गुजरातच्या घषात घालत आहे. मी आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने जाहीर करतो की, मराठी माणसाने लढून मिळवलेली मुंबई आम्ही अदानींच्या घशात घालू देणार नाही. हे सरकार पूर्ण भ्रष्ट आहे. यांनी छत्रपती शिवाजी महाराज याचा पुतळा उभारतानाही भ्रष्टाचार केला. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये ही जनता या भ्रष्ट सरकारला माफ करणार नाही. मशालीच्या धगीमध्ये हे सरकार जळून खाक होईल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. (हेही वाचा, Sharad Pawar, Uddhav Thackeray Press Conference: बंडखोरी होणार नाही, झाल्यास कारवाई; उद्धव ठाकरे याचा स्पष्ट इशारा)

'तुटू देणार नाही आणि लुटू देणार नाही'

'बटेंगे तो कटेंगे' या भाजपच्या आक्रमक प्रचारास उद्धव ठाकरे यांनीही तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. आम्ही 'तुटू देणार नाही आणि लुटू देणार नाही' असे म्हणत ठाकरे यांनी घणाघात घातला. भाजप म्हणतो बटेंगे तो कटेंगे.. कोण काटणार आहे तुम्हाला? यांचे लख आपल्यालात फूट पाडून लुटण्याचे आहे. म्हणूनच आम्ही तुटूही देणार नाही आणि लुटूही देणार नाही. म्हणूनच कोल्हापूरध्ये शिवसेना (UBT) आणि महाविकासआघाडीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहिजेत, असे ते म्हणाले. (हेही वाचा, Kolhapur North Assembly Constituency: कोल्हापूर उत्तर येथून सतेज पाटील यांना धक्का, काँग्रेसचा पंजा गायब; मधुरिमाराजे छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज मागे)

दरम्यान, महाराष्ट्रात आमची सत्ता आल्यानंतर आम्ही मुलींप्रमाणेच मुलांनाही मोफत शिक्षण देऊ, इतकेच नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज पुन्हा एकदा माफ करु. सोबतच जीवनावश्यक वस्तुंचे भावही आम्ही स्थिर ठेऊ. महाराष्ट्राच्या विकासासाठी जेजे आवश्यक आहे ते सर्व करु. सर्व महाराष्ट्रातून शिक्षण घेऊन मुंबईमध्ये येणाऱ्या तरुणांसाठी निवासाची सोय करण्यासाठी आम्ही इमारती बांधू असेही उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरातून आपल्या विधानसभा निवडणुकीचा नारळ फोडला आहे.