छत्रपती शिवाजी महाराज(Chatrapati Shivaji Maharaj) यांचे वारस उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आज के शिवाजी नरेंद्र मोदी (Aaj Ke Shivaji Narendra Modi) या पुस्तकावरील वादात आपली संतप्त प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून नोंदवली आहे. "लोकशाही आहे म्हणून शांत आहे नाहीतर त्या लेखक गोयल (Jai Bhagwan Goyal) ला राजेशाही दाखवली असती" असे म्हणत उदयनराजे यांनी तीव्र शब्दात पुस्तकावर टीका केली आहे. या ट्विट सोबतच उदयनराजे यांनी आपला व छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेला एक फोटो सुद्धा पोस्ट केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर स्वतः भाजपची कास धरलेल्या राजे यांनी एकाएकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील जयभगवान गोयल यांच्या पुस्तकावरून अशी प्रतिक्रिया दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कॉंग्रेससाहित सर्व विरोधी पक्षांनी या पुस्तकाचा निषेध करत शिवरायांची तुलना कोण्या नेत्यासोबत करणे गैर आहे अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबई काँग्रेसच्या वतीने दादरच्या टिळक भवन येथून एक निषेधार्थ आंदोलन देखील करण्यात आले होते.
पहा उदयनराजे भोसले यांचे ट्विट
लोकशाही आहे म्हणून शांत आहे, नाहीतर त्या लेखक गोयल ला दाखवलं असत राजेशाही काय असते. pic.twitter.com/bQjeuTG2uh
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) January 14, 2020
दरम्यान, भाजप कडून या पुस्तकाची किंवा गोयल यांच्या वैयक्तिक मताची कोणतीही जबाबदारी घेण्यास नकार देण्यात आला आहे तर स्वतः गोयल यांनी पक्षाने सांगितल्यास आपले पुस्तक मागे घेउ अशी भूमिका घेतली आहे. हे सारे प्रकरण विरोधकांनी उचलून धरल्याने येत्या काळात नव्या वादाला तोंड फुटणार का हे पाहणे औत्सुक्याचे आहे.