The Irish band U2 च्या कॉन्सर्ट साठी आज, 15 डिसेंबर रोजी प्रथमच एक संपूर्ण खाजगी लोकल चालवण्यात येणार आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) येथील डी. वाय . पाटील स्टेडियम (D. Y . Patil Stadium) मध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी अंधेरी (Andheri) ते नेरुळ (Nerul) अशी ही लोकलसेवा उपलब्ध असणार असून कार्यक्रमाच्या अधिकृत पासधारकांनाच या सेवेचा लाभ घेता येणार आहे. ही विशेष गाडी अंधेरी येथून आज दुपारी 2.55 वाजता सुटणार असून पहिला थांबा दुपारी 3.10 वाजता माहीम आणि पाठोपाठ कुर्ला येथे दुपारी 3.20 वाजता घेईल. तर, कार्यक्रम संपवून पार्ट येण्यासाठी नेरुळहून परतीचा प्रवास रात्री 10.50 वाजता सुरु होईल.(Mega Block 15th December 2019: मध्य ,ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक;जाणून घ्या वेळापत्रक)
Rock legends Bono, Larry, Adam Clayton आणि The Edge हे 1976 पासून आपल्या यू 2 बँडने चाहत्यांना मंत्रमुग्ध करत आले आहेत. आता हा बँड मुंबईमध्ये परफॉर्म करणार आहे.म्ह्णून त्यांच्या फॅन्समध्ये अगोदरपासूनच बरीच उत्सुकता होती. हीच बाब लक्षात घेत, बुक माय शो (BookMyShow) ने इंडियन रेल्वेच्या सोबत टाय अप करत ही खास लोकल चालवण्याचा प्रस्ताव केला होता.
याशिवाय U 2 च्या भारतातील मैफिलीसाठी चाहत्यांसाठी स्टेडीयमपर्यंत शहराच्या आसपासच्या भागातून पिक-अप आणि ड्रॉप बस सेवादेखील उपलब्ध आहेत. तर पश्चिम मार्गावरून, मध्य उपनगर मार्गे नवी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना ही लोकल रेल्वे गंतव्य स्थानी घेऊन जाईल. आज, रविवार निमित्त असणाऱ्या मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहून या सुविधेची आखणी करण्यात आली आहे.