रेल्वे रुळांवर बसून PUBG गेम खेळणे जीवावर बेतले, रेल्वेच्या धडकेने दोन तरुणांचा जागीच मृत्यू
PUBG Game (Photo Credits: Twitter)

हिंगोली येथील खटकाळी बायपास भागातील रेल्वे रुळांवर बसून पबजी गेम खेळत होते. त्यावेळी समोरुन रेल्वे भरधाव येत असल्याचे ही त्यांना भान राहिल्याने रेल्वेच्या धडकेत या दोघांचा रविवारी जागीच मृत्यू झाला.

नागेश गोरे आणि स्वप्नील अन्नपूर्णे अशी या मृत तरुणांची नावे आहेत. रेल्वेच्या रुळांवर बसून पबजी गेम खेळणे हे अत्यंत चुकीची बाब आहे. परंतु तरीही नागेश आणि स्वप्नील हे दोघे रुळांवर बसून पबजी खेळत होते. या गेममध्ये हे दोघे एवढे मग्न झाले की त्यांनी समोर येणाऱ्या रेल्वेचा आवाजाकडे ही दुर्लक्ष केले. त्यामुळे रेल्वेच्या धडकेने या दोघांना उडवले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.(हेही वाचा-Pubg Gam खेळू दिला नाही, विद्यार्थ्याने सोडले घर, मारली नदीत उडी)

मात्र हिंगोली येथे पबजी गेममुळे नागेश आणि स्वप्नील यांचा मृत्यू झाला नसून तो निव्वळ अपघात असल्याचा दावा केला जात आहे. परंतु अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे या दोघांनी आपला जीव गमावला आहे. तर जिल्ह्यात या गेममुळे दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे.