मुंबई मध्ये 9 डिसेंबरला कुर्ला भागात बेस्ट बसच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता मुंबई मध्ये 14 डिसेंबर, शनिवार च्या रात्री BVG Group च्या wet lease busची धडक बसल्याने एका तरूण मुलाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शिवाजी नगर जंक्शन (Shivaji Nagar Junction) हायवे बस स्टॉप वर अपघात झाला आहे. ही घटना रात्री 11.30 ची आहे. बेस्टची बस शिवाजी नगर मधून कुर्ला ईस्ट भागात जात होती. या बसची धडक दुचाकीला बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघातामध्ये मृत तरूणाचं नाव दीक्षित विनोद राजपूत आहे. 25 वर्षीय दीक्षित दुचाकी चालवत होता. तो बसच्या उजव्या मागील टायरला आपटला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तात्काळ पोलीस व्हॅनमधून घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 12:14 वाजता डॉक्टर डॉ. रमेश यांनी त्याला मृत घोषित केले. नक्की वाचा: CSMT BEST Bus Accident: सीएसएमटी भागात बेस्ट बसने 60 वर्षीय व्यक्तीला चिरडले; बेस्ट बस चालक अटकेत .
Maharashtra: A two-wheeler rider died after sustaining head injury upon colliding with a bus near Shivaji Nagar Junction bus stop in Ghatkopar East of Mumbai.
— ANI (@ANI) December 15, 2024
39 वर्षीय विनोद आबाजी रणखांबे बस चालवत होता. त्याच्यासोबत बस मध्ये वाहक अविनाश विक्रमराव गिते होता. या अपघातामुळे पुन्हा बस बाबत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या या बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे.