Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई मध्ये कुर्ला (Kurla) परिसरात दोन दिवसांपूर्वी बेस्ट बसच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज सीएसएमटी (CSMT) भागात एका बसने 60 वर्षीय वृद्धाला धडक दिली असून त्याचा मृत्यू झाला आहे. मुंबई पोलीस झोन एक च्या ऑफिसजवळ हा अपघात झालाआहे. दरम्यान या अपघामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आज दुपारी साडे चारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. सीएसएमटी स्थानकाजवळ मुंबई पोलिस झोन च्या ऑफिस जवळ 60 वर्षीय व्यक्तीला आधी दुचाकीने धडक दिली. ते रस्त्यावर पडले. त्यानंतर मागून येणार्‍या बेस्ट बसने त्याने चिरडले. या प्रकरणी MRA पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बस कुलाबाच्या दिशेने जात असताना अपघात झाला आहे. दरम्यान पोलिसांनी बस चालकाला अटक केली असून दुचाकीस्वाराचा शोध सुरू आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मीडीया रिपोर्ट नुसार, ए 26 बस ने त्या वृद्ध व्यक्तीला उडवलं आहे. नक्की वाचा: Kurla Bus Accident: 'योग्य प्रशिक्षणाचा अभाव'; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती .

सीएसएमटी स्टेशन जवळ बस अपघात

 

दरम्यान कुर्ल्यातील अपघातानंतर सध्या कुर्ला डेपो मधून बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. या प्रकरणी बस चालकाला अटक झाली असून हा अपघात नेमका कसा झाला याचा अधिक तपास सुरू आहे. रात्री 9.30 च्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये 7 जण मृत्यूमुखी झाले असून 49 जखमींवर विविध हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.