Malshej Ghat Tanker Accident: माळशेज घाटात दोन टॅंकरची धडक, भीषण अपघातात चार दगावले

मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दुधाचा टॅंकर आणि मालवाहू टॅकरमध्ये धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र Pooja Chavan|
Malshej Ghat Tanker Accident: माळशेज घाटात दोन टॅंकरची धडक, भीषण अपघातात चार दगावले
Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Malshej Ghat Tanker Accident: मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दुधाचा टॅंकर आणि मालवाहू टॅकरमध्ये धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात काल (3 मे रोजी) दुपारी घडला. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता. रस्त्यावर वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. सतत अपघाताची मालिका सुरु असल्याने नारगिकांनी प्रशासनावर सुरक्षेतासाठी प्रश्नचिन्हा उभा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माळशेज घाटातील आवळ्याची वाडीजवळ हा अपघात झाला. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने ही घटना घडली. ही धडक इतकी भीषण होती की,दोन्ही वाहने पलटली. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू मध्ये पती पत्नीचा समावेश आहे. हे दोघे पांगरी गावाचे रहिवासी आहे. सुदैवाने या अपघातात त्यांचा मुलगा ( वय 3 ) वाचला. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ झाला.

अपघातानंतर तात्काळा माहिती पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळावरून चार जणांचे मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांना विस्कळीत वाहतूक सेवा सुरळीत केली. मालवाहू टॅंकर आणि दुधाचा टॅंकरचा चालकांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. सततच्या अपघातामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. अपघातग्रस्त मृतांची माहिती कुटुंबियांना देण्यात आली.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change