Beed: कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू, बीड येथील घटना
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

बीड (Beed) जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजरे लावली असून पिकांमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यातच गोदावरी पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन सख्या बहिणींचा पाण्यात बडून (Drowned) मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.त्यानंतर दोन्ही मुलींचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी चकलांबा पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नेहा कोरडे (वय, 9) आणि अमृता कोरडे (वय, 8) असे मृत मुलीची नावे आहेत. या दोघीही गेवराई तालुक्यातील रहिवाशी आहेत. त्या कपडे धुण्यासाठी गोदावरी नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी दोघीही पाय घसरून पाण्यात पडल्या. दरम्यान, दोघींना पोहता येत नसल्याने त्या पाण्यात बुडाल्या. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे देखील वाचा- Heavy Rainfall in Aurangabad: कन्नड-चाळीसगाव सीमेवर ढगफुटी, कन्नड घाटात दरड कोसळून वाहने अडकली, औरंगाबाद मध्ये पूर

गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात फक्त तीन ठिकाणी वाळूचा ठेका देण्यात आलेला आहे. मात्र, इतर ठिकाणीही वाळू उपसली जात आहे. ज्यामुळे परिसरात खड्डे तयार झाले आहेत. यापैकी एका खड्यात पडून या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांकडून आणि मृतांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. याप्रकरणी महसूल प्रशासनासह वाळू माफीयांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, अशा मागणींनी जोर धरला आहे.