Instagram (PC - pixabay)

पुण्यामध्ये ड्र्रिम्स 11 या ऑनलाईन गेमिंग अ‍ॅपवर  दीड कोटी जिंकून रातोरात करोडपती झालेल्या पोलिस कर्मचार्‍यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता रेल्वेच्या पोलिस कर्मचार्‍यांनी युनिफॉर्ममध्ये इंस्टाग्राम वर रील्स बनवून अपलोड करणं त्यांना महागात पडलं आहे. युनिफॉर्ममध्येच रील्स करून अपलोड  केल्याने त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई केल्याची बाब समोर आली आहे. हे रेल्वेचे पोलिस कर्मचारी मुंबई मधील आहेत.

निलंबनाची कारवाई झालेल्या दोन रेल्वे पोलिस कर्मचार्‍यांमध्ये महिला कर्मचारीचादेखील समावेश आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या पोलिस कर्मचार्‍यांनी इंस्टा रील बनवत ते सोशल मीडीयामध्ये अपलोड केले आहे. जेव्हा वरिष्ठांना या प्रकाराची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी डेप्युटी कमिशनरला माहिती देत या प्रकरणी विभागीय चौकशी लावली आहे. आता चौकशी होत नाही तो पर्यंत दोन्ही कर्मचार्‍यांना कामापासून दूर ठेवले आहे. PSI Somnath Zende Suspended: ड्रीम 11 मधून रातोरात करोडपती झालेले सोमनाथ झेंडे निलंबित .

मुंबई लाईव्हच्या रिपोर्ट्सनुसार, वरिष्ठ अधिकार्‍यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. गणवेशात असलेल्यांनी त्याचा मान राखलाच पाहिजे. सध्या डिसिप्लनेरी अ‍ॅक्शन साठी चौकशी सुरू आहे. सर्व्हिस रूल्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी आता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचेही सांगितले आहे.