ड्रीम 11 मधून रातोरात करोडपती झालेले सोमनाथ झेंडे (PSI Somnath Zende) यांचा लॉटरी जिंकण्याचा आनंद क्षणभंगूर ठरला आहे. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सोमनाथ झेंडे हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांना क्रिकेटचे वेड होते. इंग्लंड विरुद्ध बांग्लादेश सामन्यात याच ड्रीम 11 मुळं त्यांना दीड कोटींचं बक्षीस लागलं. करोडपती झालेला हा पोलीस उपनिरीक्षक प्रकाशझोतात आला आणि हीच बाब आता त्यांच्या नोकरीच्या आड आली आहे.
सोमनाथ झेंडे सरकारी नोकरी मध्ये असताना जुगारासारख्या खेळामध्ये आले. एकीकडे सरकार तरूणाईला जुगारापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करत असतना सरकारी नोकरीतील आणि वर्दीतील एक कर्मचारी अशा प्रकारे पैसे कमावत असेल तर हे योग्य नाही असं म्हणत पिंपरी-चिंचवड भाजपाचे माजी संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडेविरुद्ध राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दिली होती. त्यानंतर ही कारवाई झाली आहे. फॅन्टसी क्रिकेट अॅपवर बक्षीस लागून कोट्यावधी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची होणार चौकशी - रिपोर्ट्स .
सोमनाथ झेंडे यांनी जिंकलेल्या रकमेतील टीडीएस वजा करून उर्वरित रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याच बक्षिसाच्या दीड कोटींमुळे आता झेंडे यांना खात्यातंर्गत चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलेल्या त्यांच्या चौकशीमधून आता निलंबन करण्यात आलं आहे. पुढे विभागीय चौकशी मध्ये त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल आणि नंतर या निलंबनाचा पुढील निर्णय होईल.