Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

मुंबई (Mumbai) मधील चारकोप भागातील मंदिराला काल (26 डिसेंबर, शनिवार) रात्री आग लागली. या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीरपणे जखमी झाला आहे, अशी माहिती मुंबई फायर ब्रिगेडने (Mumbai Fire Brigade) दिली आहे. ANI वृत्तसंस्थेने ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली. तसंच फोटो देखील पोस्ट केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र जिवीतहानी टाळता आली नाही. जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरु आहे.

हे तिघेही रात्रीच्या वेळेस आसरा म्हणून मंदिरात झोपले होते. काळाने डाव साधला आणि दोघांचा मृत्यू झाला. जखमी व्यक्तीला शब्तादी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र तो 95 टक्के भाजला असून त्याची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. ही घटना पहाटेच्या वेळी घडली असून पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

ANI Tweet:

जखमी व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही रात्रीच्या वेळेस मंदिरात आसरा म्हणून झोपत असतं. झोपताना शटर बंद करत असतं. कालही त्यांनी तेच केले. मात्र सकाळी जाग आली तेव्हा ते तिघेही आगीत होरपळत होते. (Lower Parel Fire: लोअर परळ येथील सन मिल कंम्पाउंडमध्ये आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल)

यापूर्वी डोंबिवली च्या एमआयडीसी खांबालपाडा परिसरातील शक्ती प्रोसेस कंपनीला आग लागली होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे जीवितहानी टळली.