Dombivli Fire: डोंबिवली एमआयडीसी खांबालपाडा परिसरातील शक्ती प्रोसेस कंपनीला भीषण आग

त्यामुळे या आगीने भीषण रुप धारण केले आहे.

Dombivli Fire: डोंबिवली एमआयडीसी खांबालपाडा परिसरातील शक्ती प्रोसेस कंपनीला भीषण आग
Fire | (Photo Credits: Pixabay)

डोंबिवली (Dombivli) एमआयडीसी खांबालपाडा (Khambalpada) परिसरातील शक्ती प्रोसेस (Shakti Process) या कंपनीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग आज शुक्रवारी सांयकाळी लागली आहे. शक्ती प्रोसेस ही कपड्याची कंपनी आहे. त्यामुळे या आगीने भीषण रुप धारण केले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली? हे स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या कंपनीतील कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सुट्टी असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही आग संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास लागली आहे. आगाचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सातत्याने डोंबिवलीत आग लागण्याची घटना घडली. बेकायदा भंगार गोदाम आणि केमिकल कंपन्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. या आगीनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली होती. हे देखील वाचा- Solapur: करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या ठार; 3 व्यक्तिंसह वासराचा घेतला होता जीव

काही दिवसांपूर्वी डोंबिवली येथील सोनारपाडा परिसरात भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली होती. त्यावेळी सात आठ गोदामाला ही आग लागली होती. या गोदामांमध्ये टीव्ही, फ्रीज, यासोबतच इतर इलेक्ट्रॉनिक पार्ट्स ठेवतात. दरम्यान, आग लागल्यानंतर घटनास्थळी स्फोटांचे आवाज झाले होते. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

(The above story first appeared on LatestLY on Dec 18, 2020 08:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).