Lower Parel Fire: लोअर परळ येथील सन मिल कंम्पाउंडमध्ये आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

Lower Parel Fire Breaks Out: मुंबईतील लोअर परळ येथील सन मिल कंम्पाउंडमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु करण्यात आले असून आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे सांगितले जात आहे.(मुंबई: मालाड च्या त्रिवेणी नगर परिसरात भीषण आग, अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल)

लोअर परळ येथील आग  विझवण्याचे काम अग्निशमन दलाकडून शर्थीने करण्यात येत आहेत. रात्रीच्या वेळेस ही आग लागल्याची दुर्घटना घडल्याने परिसरात नागरिकांची गर्दी आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर गेल्या काही काळापासून मुंबईत आग लागण्याचा घटनांचे सत्र सुरु असल्याचे दिसून येत आहे. (Mumbai Fire: प्लास्टिक PVC फिटिंग मटेरियल नेणाऱ्या कंटेनरला मुंब्रा बायपास जवळ आग; RDMC ची टीम, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल)

 Tweet:

 

याआधी मुंबईतील चिकूवाडी  भागात 23 नोव्हेंबरला भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. घटनेची माहिती मिळताच 3 अग्निशमन दलाच्या गाड्या  घटनास्थळी रवाना झाल्या होत्या. ही आग कुठे आणि कशामुळे लागली याबाबत अजून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती.