Mumbai Fire: चिकूवाडी परिसरात भीषण आग, 3 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना
ही आग कुठे आणि कशामुळे लागली याबाबत अजून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्याचबरोबर आगीचे स्वरूप देखील समजले नाही.
मुंबईत (Mumbai) आज धक्कादायक घटनांचे सत्र सुरुच आहे. आज सकाळी कुर्ला परिसरात सार्वजनिक शौचालय कोसळल्याच्या घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ऐकतो ना ऐकतो तोच मुंबईतील चिकूवाडी (Chikoowadi) भागात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच 3 अग्निशमन दलाच्या गाड्या (Fire Engines) घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग कुठे आणि कशामुळे लागली याबाबत अजून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्याचबरोबर आगीचे स्वरूप देखील समजले नाही.
मुंबईतील गजबजलेला परिसर चिकूवाडीत ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच 3 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाला असल्याची माहिती ANI ने दिली आहे.हेदेखील वाचा-मुंबई: मालाड च्या त्रिवेणी नगर परिसरात भीषण आग, अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल
Maharashtra: Fire breaks out at Chikoowadi area of Mumbai; three fire engines rushed to the spot.
— ANI (@ANI) November 23, 2020
दरम्यान सकाळी कुर्ला परिसरात सार्वजनिक शौचालय कोसळून त्यात एक महिला अडकली होती. तिला सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि प्रथमोपचार करुन तिला रुग्णालयात पाठवले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शौचालयाचं छत कोसळल्याने संबंधित परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून या महिलेला बाहेर काढले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2020 03:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

