मुंबईतील (Mumbai) ग्रँट रोड (Grant Road) येथील पाववाला स्ट्रीट (Pavwala Street) या भागात असलेल्या एका तीन मजली इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत 2 दोन जण जखमी झाली असून त्यांना उपाचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे, अशी माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी अजय जाधव यांनी दिली आहे. अग्निशमन दलाचे पथक या ठिकाणी दाखल झाले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून संततधार कोसळत असल्याने या जीर्ण इमारतीचा भाग कोसळला असावा असे वृत्त आहे.
बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यानंतर इमारातीत राहणाऱ्या रहिवाशांचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज येऊ लागला. स्थानिक भागात राहणाऱ्या लोकांनी माहिती दिल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. दरम्यान, २ जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी अजय जाधव यांनी दिली आहे. हे देखील वाचा- Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पावसाचा सामना करण्यासाठी घेण्यात आलेल्या उपाययोजनांचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला आढावा (Watch Video)
एएनआयचे ट्विट-
#UPDATE Two people injured after a portion of a house collapsed in Grant Road area of Mumbai, Maharashtra. The injured have been taken to a hospital: Ajay Jadhav, a fire department official https://t.co/0haEKj35l5
— ANI (@ANI) July 15, 2020
मुंबईत आज (15 जुलै) सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शहरांमधील अनेक भागात पाणी साचले आहे. मुंबईतील सखल भागांमध्ये म्हणजेच हिंदमाता आणि किंग्स सर्कल येथे पाणी साचले. तसेच अंधेरीतील काही भागांतही पाणी साचल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्यामुळे नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.