Coronavirus outbreak (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यात पुण्यासाठी तर आजचा दिवस हा खूपच धक्कादायक होता. आज दिवसभरात पुण्यात 10 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून पुण्यात एकूण मृतांचा आकडा 18 वर जाऊन पोहोचला आहे. ही खूपच चिंताजनक गोष्ट असून कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड (PMC Commissioner Shekhar Gaikwad) यांनी सांगितले आहे. पुण्यासारख्या शहरात कोरोना बाधितांची मृतांच्या आकड्यात इतक झपाट्याने वाढ होत राहणे हे चित्र खूपच चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

आज पुण्यात सकाळपासून 25 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. संबंधित रुग्ण हे शहराच्या विविध भागातील आहेत. आज 25 नव्या रुग्णांची भर पडल्याने पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 154 इतकी झाली आहे. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरधीर मोहोळ यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे. तसेच नागरिकांना घरी राहा, सुरक्षित राहा, असं आवाहनही मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.

हेदेखील वाचा- महाराष्ट्र अद्याप कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात गेलेला नाही; राजेश टोपे

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1135 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 117 कोरोना रुग्णांनी या विषाणुवर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र अद्याप तिसऱ्या टप्प्यात गेलेला नाही. मात्र, येत्या काळात नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

तर भारतात कोरोना बाधितांची संख्या 5274 वर पोहचली आहे. तर 411 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 149 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 4714 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. लोकांनी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली नाही तर ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आरोग्य मंत्रालयाने वर्तविली आहे.