Two Drowned In Ratnagiri: मित्रांसोबत बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मित्रांसोबत बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू (Drown) झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना रत्नागिरीच्या (Ratnagiri) संगमेश्वर तालुक्यातील (Sangameshwar) धामापूर (Dhamapur) येथे घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमेश्वर तालुक्यातील भायजेवाडी येथील बंधाऱ्याला पाणी आले. यामुळे परिसरातील सहा तरूण त्याठिकाणी पोहायला गेले. परंतु, पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने यापैकी दोघे जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही तरूणांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेवर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या संदर्भात टीव्ही9 मराठीने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Mumbai Rape: मुंबईतील धक्कादायक घटना; आईसक्रिम देण्याच्या बहाण्याने चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार

याआधी औरंगाबाद शहरातही मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 12 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला होता. क्रेंबिज जवळच्या डोहात ही घटना घडली होती. आदिल शेक असे मृत मुलाचे नाव होते. आदिल शेख हा सहा फूट खोल पाण्यात बुडाल्यानंतर मित्रांनी आरडाओरड केली. मात्र, मदतीस उशीर झाल्याने आदिलचा मृत्यू झाला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन या मुलाचे मृतदेह पाण्याबाहेर काढले होते.