कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर शहरात बुधवारी (6 ऑक्टोबर) संध्याकाळी वादळी वाऱ्यासह प्रचंड मुसळधार पाऊस पडला. ज्यामुळे अनेक भागात झाडे उन्मळून पडली आहेत. तर,अनेक ठिकाणी होर्डिंग्ज पडण्याचा घटना घडल्या आहेत. याचदरम्यान, अंबरनाथ पूर्व (Ambernath) भागातील महालक्ष्मीननगर गॅस गोडाऊन परिसरात नगरपालिका उद्यानाची आरसीसी बांधकामाची सुरक्षा भिंत कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक नागरिक जखमी झाले आहेत. याचबरोबर घर आणि वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहेत.
गोविंद केसरकर (38) आणि प्रविण कदम (30) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दल आणि पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच दोन्ही नागरिकांनी मृत नागरिकांना तात्काळ मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आले. तर जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे देखील वाचा- Maharashtra Temples Reopen: महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे आजपासून उघडली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचे पालन करून दर्शन घेण्याचे केले आवाहन
दरम्यान, मुसळधार पावसामुळे बेळगाव तालुक्यातही बडाल अंकलगी गावातही मोठी दुर्घटना घडली आहे. घर कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्याला सुरुवात केली आहे.