Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर (Burhanpur-Ankleshwar Highway) ट्रक आणि क्रूजर यांच्यात भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर ट्रक आणि क्रूजर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात क्रूजरमधील प्रवाशी चोपडा येथून स्वागत समारंभ आटोपून येत असताना हा अपघात झाला. अपघातग्रस्त क्रूजर कारमधील सर्व प्रवासी एकाच कुटुंबातील होते. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातात प्रभाबाई प्रभाकर चौधरी (वय, 45), सोनाली जितेंद्र चौधरी (वय, 35) सोनल सचिन महाजन (वय, 37), गंगाबाई ज्ञानेश्‍वर चौधरी (वय, 35) उमेश चौधरी (वय, 28), प्रभाकर नारायण चौधरी (वय, 63), प्रिया जितेंद्र चौधरी (वय,10) प्रियंका नितीन चौधरी (वय, 25) सुमनबाई श्रीराम पाटील (वय, 60) संगीता मुकेश पाटील (वय, 33) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच सर्वेश नितीन चौधरी, शंतनू मुकेश पाटील, अंवी नितीन चौधरी, मीना प्रफुल्ल चौधरी, सुनिता राजाराम चौधरी, आदिती मुकेश पाटील आणि शिवम प्रभाकर चौधरी हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा - आटपाडी: कार विहीरीत पडून 5 जणांचा मृत्यू 1 जण गंभीर जखमी; झरे-पारेकडवाडी रस्त्यावरील घटना)

राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रात जानेवारी ते डिसेंबर 2019 या एका वर्षाच्या कालावधीत 32 हजार 876 रस्ते अपघात झाले. या अपघातात 12 हजार 565 जणांचा मृत्यू झाला आहे. 2019 मध्ये सर्वाधिक अपघात मुंबईमध्ये झाले. मुंबईमध्ये झालेल्या अपघातांची संख्या 2 हजार 856 इतकी आहे.