महाराष्ट्रात टीआरपी घोटाळ्यामध्ये संशयाच्या भोवर्यामध्ये असलेल्या अर्णब गोस्वामी (Republic TV Editor Arnab Goswami)आणि एआरजी आउटलियर मीडिया यांच्याबाबत बॉम्बे हाय कोर्टात आज सुनवाणीदरम्यान मुंबई पोलिसांना न्यायालयाने महत्त्वाचे आदेश आहेत. दरम्यान जर मुंबई पोलिसांना Arnab Goswami यांना अटक करायची असेल तर त्यांना 3 दिवसांची नोटीस देणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. तसेच कोर्टाने अर्णब गोस्वामी आणि वाहिनीची मालकी असलेल्या एआरजी आउटलियर मीडिया या कंपनीची याचिका दाखल करुन घेतली. TRP Scam: टीआरपी घोटाळयाप्रकरणी अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्हीविरूद्ध पुरावे मिळाले; मुंबई पोलिसांची उच्च न्यायालयात माहिती.
बॉम्बे हाय कोर्टाने आज गोस्वामी आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर संशयित आरोपीची टांगती तलवार किती दिवस ठेवणार? असा सवाल विचारत तपास असाच सुरू ठेवता येऊ शकत नाही असे म्हटले आहे. यावर महाराष्ट्र राज्य सरकारने येत्या 12 आठवड्यांमध्ये तपास पूर्ण केला जाईल असं म्हटलं आहे.
ANI Tweet
Bombay High Court directs Mumbai police to give three days prior notice to Republic TV Editor Arnab Goswami if he needs to be arrested.
— ANI (@ANI) March 24, 2021
दरम्यान कथित टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राविरूद्ध आणि पोलिसांच्य कारवाईपासून संरक्षण मिळावे तसेच याप्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीकडून अर्णब गोस्वामी आणि एआरजी आउटलियर मीडिया कंपनीने याचिका सादर केली आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सध्या नियमित सुनावणी सुरू आहे.