Nashik | Twitter

महाराष्ट्रामध्ये 17 ऑगस्ट पासून अधिक महिन्यातील श्रावस मासानंतर नीज श्रावण सुरू होणार आहे. यानिमित्ताने भाविकांची वाढती गर्दी पाहता आज (12 ऑगस्ट) पासून 15 सप्टेंबर पर्यंत व्हीआयपी दर्शन नाशिकच्या त्र्यबंकेश्वर मंदिरामध्ये बंद केले जाणार आहे. या व्हिआयपी दर्शनाचा फटका सामान्य भाविकांना बसतो. त्यामुळे सध्या लागून आलेल्या सुट्ट्या आणि नंतर श्रावण मास पाहता त्र्यंबकेश्वर देवस्थान कडून व्हिआयपी दर्शन बंद करण्यात आलं आहे.

12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी असते. श्रावणी सोमवारी अनेक भक्तगण दर्शनाला येतात. पण यामध्ये सामान्यांना दर्शन मिळावं म्हणून काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. व्हीआयपी दर्शन बंद केले असले तरीही केंद्र आणि राज्य स्तरावरील राजशिष्टाचार म्हणून येणार्‍या व्हीआयपींना मात्र दर्शन दिले जाणार आहे. नक्की वाचा: Dugarwadi Waterfall (Nashik) News: जरा जपून! दुगारवाडी धबधब्यात पर्यटक गेला वाहून, त्र्यंबक येथील घटना .

विकेंडला जोडून सुट्टी घेत अनेकजण फिरायला बाहेर पडले आहेत. अनेकांचा कल श्रावण मासात, अधिक मासात देवदर्शनाला जाण्याचा असतो. यामुळे अनेक प्रसिद्ध देवस्थानांमध्ये गर्दी उसळते. अशात व्हीआयपी दर्शन सुरू ठेवल्यास तासनतास रांगेत उभे राहणार्‍या भाविकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे 15 सप्टेंबरपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे.