अलिबाग येथील नीरव मोदी याच्या बंगल्यात सापडला दुर्मिळ वस्तूंचा खजिना
नीरव मोदी (Photo Credits: Facebook/File)

भारतीय बँकांना चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचा अलिबाग (Alibagh) येथील बंगला जमीनदोस्त करण्यात आला आहे. तर मोदीच्या या अनधिकृत बंगल्यावर कारवाई करु नये अशी मागणी ईडी (ED) कडून करण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाने ईडीच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत मोदी याचा अलिशान बंगला पाडण्यासाठी हिरवा कंदील दाखवला.

नीरव मोदी (Nirav Modi) याचा पाडण्यात आलेल्या बंगल्यामध्ये महागडी पेंटिंग्स, लिलावामध्ये घेतलेली 30 लाखांची लाकडी कार आणि निजाम काळातील पडदे मिळाले आहेत. दरम्यान, आयकर आणि ईडीने छापा टाकून 125 पेक्षा अधिक पेंटिंग्स, हैद्राबाद येथील निजामशाही काळातील पडदे आणि हॉगकॉगमधील लिलावातील 30 लाखांची कार सापडली आहे. (हेही वाचा-फरार आरोपी नीरव मोदी याचा अलिबाग येथील बंगला पाडला)

रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने वकिलांनी कोर्टाला सांगितले की, नीरव मोदी बंगल्याविरोधात कारवाई करण्याची नोटीस काढण्यात आली होती. तसेच सीबीआयने बंगल्याला सील केले असून ईडी याबाबत चौकशी करणार होती. मात्र ईडीला धारेवर धरत या बंगल्याबाबत कारवाई करण्यास कोणती अडचण आहे असा प्रश्न विचारला. परंतु रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी हा बंगला अनधिकृत ठरवत बरखास्त करण्याचे काम सुरु केले होते.