ST Bus (फोटो सौजन्य - फेसबुक)

ST Fare Price To Hike: एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, आता लालपरीचा (Lalpari) प्रवास महागणार आहे. एसटी महामंडळाने भाडेवाढ (ST Fare Hike) करण्याचा विचार केला असून 14.13 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. हा प्रस्ताव भाडेवाढीशिवाय तीन वर्षांचा आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भाडेवाढीचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

किती रुपयांनी वाढणार एसटी तिकिट -

एसटी महामंडाळाने ठेवलेल्या प्रस्तावानुसार, 14.13 टक्के वाढ मंजूर झाल्यास प्रवाशांना सध्या 100 रुपयांच्या तिकिटावर 15 रुपये जादा मोजावे लागतील. सुरुवातीला परिवहन विभागाने 12.36 टक्क्यांची किरकोळ वाढ सुचवली होती, मात्र नंतर महामंडळात झालेल्या चर्चेनंतर त्यात सुधारणा करून 14.13 टक्के करण्यात आली. (हेही वाचा - MSRTC Strike: राज्यातील ST Bus कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 50% पेक्षा जास्त बस डेपोवर परिणाम; महसुलाचे मोठे नुकसान, मुख्यमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक)

दरम्यान, आता नवीन 14.13 टक्के दरवाढ मंजूर करायची की अन्य पर्यायांचा विचार करायचा याबाबत नवीन सरकार निर्णय घेणार आहे. महामंडळाच्या या निर्णयाचा प्रवाशांवर मोठा परिणाम होणार आहे. याशिवाय, कॉर्पोरेशनच्या संपूर्ण नेटवर्कमध्ये तिकीट दरांवरही याचा परिणाम होणार आहे. (हेही वाचा - Girls Beat ST Bus Conductor With Slippers: रत्नागिरीत 2 विद्यार्थिनींनी एसटी बस कंडक्टरला केली चप्पलने मारहाण; मुलींचा विनयभंग केल्याचा आरोप (Watch Video))

तत्पूर्वी, सप्टेंबर महिन्यात प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्यामुळे एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्यभरातील सर्व एसटी डेपोत संप पुकारण्यात आला होता. राज्यातील 11 एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीने संप जाहीर केल्याने 251 पैकी 35 डेपो पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. या संपाचा एमएसआरटीसी पुणे विभागावर लक्षणीय परिणाम झाला होता.