Anil Parab | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation) राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करण्याची मागणी तातीडने पूर्ण होण्यासारखी नाही. दूरगामी परिणामांचा विचार करुन त्यावर निर्णय घ्यावा लागेल. न्यायालयाने याबाबत समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार काम सुरु आहे. त्यामुळे संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी (MSRTC Workers Strike) कामावर परत यावे. अन्यथा जनसेवेसाठी राज्य सरकारला पर्यायांचा विचार करवा लागेल, असा थेट इशारा परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab ) यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे. तसेच, अनेक आगारातील कर्मचारी पुन्हा कामावर परतत आहेत. जे कर्मचारी कामावर परततील त्यांना संरक्षण दिले जाईल, असेही अनिल परब यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटत असतील तर आझाद मैदानच काय इतर कोणत्याही ठिकाणी चर्चेस जाण्यासाठी तयार आहे. मात्र, राजकीय मंडळींच्या नाताला लागून कर्मचाऱ्यांनी आपले नुकसान करुन घेऊ नये. कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले तर ते नुकसान गोपीचंद पडळकर किंवा सदाभाऊ खोत भरुन देणार नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या हिताचा विचार करुन कामावर परतावे, असे अवाहन अनिल परब यांनी केले. (हेही वाचा, MSRTC Workers Strike: एसटी कर्मचारी संप, शिवशाही बस दोन्ही सुरु, आंदोलनाचे पुढे काय होणार याबाबत उत्सुकता)

दरम्यान, ऐन दिवाळीच्या वेळी सर्वसामान्य जनता आणि नागरिकांची अडवणूक करण्याचे काम संपातून झाले. याला आमदार पडळकर आणि सदाभाऊ खोत हेसुद्धा जबाबदार आहेत. संपाचे राजकीय भांडवल केले जात आहे. संप करणाऱ्यांना आणि भाजपलाही माहिती आहे विलीनिकरणाची मागणी योग्य नाही. तसेच, ती पूर्ण होणारीही नाही. त्यामुळे आता त्यांना आंदोलन भरकटवण्याखेरीच पर्याय नाही. आता ते वेगवेगळे आरोप करु लागतील. माझ्यावरही आरोप करतील. माझ्यावर जरुर आरोप करा. चौकशी करा. त्यात दोषी आढळलो तर थेट फाशी द्या. पण कामरागांचे नुकसान करु नका, असेही अनिल परब या वेळी म्हणाले.

कोण नितेश राणे?

नितेश राणे यांनी केलेल्या आरोपाला आम्ही किंमतच देत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याची आणि टीका करण्याची त्यांची पात्रता तरी आहे का? कोण आहेत नितेश राणे? आम्ही त्यांना ओळखत नाही, अशा स्पष्ट शब्दात अनिल परब यांनी भाष्य केले. नितेश राणे यांनी केलेल्या टीकेबाबत प्रसारमाध्यमांनी अनिल परब यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे भाष्य केले.