Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

कोरोना व्हायरसची परिस्थिती अद्याप कायम आहे. मात्र आता हळूहळू लॉकडाऊन उठवला जात असून अनलॉकिंग नुसार टप्प्याटप्प्याने काही गोष्टी आता सुरु केल्या गेल्या आहेत. तर सणासुदीचे दिवस जवळ आले असून त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. याच कारणास्तव आता मुंबईत मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर या आठवड्यापासून काही स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.(आजपासून बदलले Railway Reservation चे नियम, प्रवासाच्या 5 मिनिटांपूर्वी करता येणार तिकिट बुक)

पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण 8 स्पेशल ट्रेन धावणार आहेत. त्यात मुंबई सेंट्रल-इंदौर सुपरफास्ट अवंतिका एक्सप्रेस, मुंबई सेंट्रल ओखा सुपरफास्ट सौश्र मेल आणि बांद्रे टर्मिनस-रामनगर सुपरफास्ट एक्सप्रेस 15 ऑक्टोंबर पासून नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

त्याचसोबत वांद्रे टर्मिनस-लखनौ सुपरफास्ट एक्सप्रेस, वांद्रे टर्मिनस- भावनगर सुपरफास्ट एक्सप्रेस, वांद्रे टर्मिनस- भुज एसी एक्सप्रेस, वांद्रे टर्मिनस- एच निजामु्द्दीन युवा एक्सप्रेस आणि मुंबई सेंट्रल- अहमदाबाद तेजस एक्सप्रेस सुद्धा धावणार आहेत. तर मध्य रेल्वे मार्गावर स्पेशल ट्रेन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस- कामख्या एसी विकली अशी चालवली जाणार आहे.(Indian Railways: सणासुदीच्या काळात प्रवाशांना भारतीय रेल्वेकडून भेट; ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये चालवणार 200 अतिरिक्त गाड्या)

दरम्यान, 17 ऑक्टोंबर पासून तेजस एक्सप्रेस नागरिकांसाच्या सेवेसाठी सुरु करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसच्या कारणामुळे लखनौ-नवी दिल्ली आणि अहमदाबाद-मुंबई मार्गाने धावणारी तेजस एक्सप्रेस बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा याच मार्गाने ती पुढील आठवड्यापासून नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. पण कोरोनाची परिस्थिती पाहता प्रवाशांना प्रवासावेळी काही नियमांचे पालन करावे लागणार आहे