Mumbai Traffic | photo Credits: Twitter @gauravdedhia2

मुंबई शहरात धारावी, वरळी भागातून कोरोनाचा धोका ओसरत असताना आता मुंबईच्या उपनगरांमध्ये उत्तर दिशेला त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशामध्ये ही स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी काल (28 जून) नागरिकांना 2 किमी पेक्षा बाहेर अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. मात्र या नव्या नियमामुळे आज शहरातअनेक नाक्यांवर ट्राफिक जाम बघायला मिळाले आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी खाजगी कार्यालयात काम करणारे मुंबईकर रस्तेमार्गांनी बाहेर पडताच अनेकांना जागोजागी अडवण्यात आले आहे. त्यांच्याकडून बाहेर पडण्याचं कारण विचारलं जात असल्याने मुंबई शहरात दहिसर (Dahiser), मुलुंड चेक नाका(Mulund Check Naka) , कांदिवली वेस्टर्न एक्सप्रेस मार्ग (Kandivali Western Express Way) या ठिकाणी वाहनांची लांबच लांब पहायला मिळाली आहे.यासोबतच पूर्व द्रुतगती मार्गावर देखील गर्दी असल्याने सायन (Sion), हिंदमाता परिसरात गर्दी झाली आहे. या या तुलनेत मुंबईकडून ठाण्यात जाण्याच्या मार्गावर वाहनांची गर्दी कमी आहे. (मुंबईतील स्थानिकांनी घरापासून 2 किमी पेक्षा अधिक अंतरावर जाण्याचे टाळावे, मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन).

दरम्यान आजपासून मुंबईकर विनाकारण रत्यावर बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय गरज आणि खाजगी कार्यालयांना मुभा आहे. मात्र आता एमएमआर रिजनमध्ये पास शिवाय फिरता येत असल्याने अनेकजण भटकत असताना, सार्वजनिक स्थळी गर्दी करत असताना दिसतात. यामुळे कोरोनाचा धोका अधिक बळावू शकतो.

ट्वीट

दहिसर चेक नाका  ट्राफिक 

मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवा आणि सरकरी कर्मचार्‍यांसाठी, पत्रकारांसाठी मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंची खरेदी, दुकानांमधे खरेदी करण्यासाठी मुंबई करांनी 2 किमीच्या पलिकडे जाऊ नये असं आवाहन मुंबई पोलिस आणि प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.