Aaditya Thackeray (Photo Credits: Instagram)

येत्या 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्ष पूर्ण होणार आहेत. याच पार्श्वभुमीवर राज्याला सिंगल प्लास्टिक यूज (Single Plastic Use) पासून मुक्त करण्याचे लक्ष पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ठेवले आहे. याबाबत महाराष्ट्र प्लास्टिक मुक्त होण्यासाठीचे निर्देशन सुद्धा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मंगळवारी आदित्य ठाकरे यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि कलेक्टर यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरेंसच्या माध्यमातून संवाद साधला त्याचवेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरांसह ग्रामीण भाग सुद्धा सिंगल युज प्लास्टिक मुक्त करणार असल्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी प्रत्येक महानगरपालिका, नगरपालिका यावर कोणत्या उपाययोजना करु शकतात त्याचा विस्तृत प्लॅन 10 फेब्रुवारी पर्यंत सरकारला देणार आहे. प्लास्टिक बंदी करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असला तरीही नागरिकांनी त्याला प्रतिसाद देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्लास्टिक बंदी बाबत जगजागृती सुद्धा करण्यात येणार आहे.(मुंबई मध्ये 27 जानेवारीपासून मॉल, उपहारगृह 24x7 सुरू ठेवण्यास परवानगी; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा निर्णय)

राज्यात 23 जून 2018 मध्ये रामदास कदम यांनी वाढत्या प्लास्टिक वापरामुळे प्रदुषण होत असल्याने त्यावर बंदी घालण्यात यावी असा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर प्लास्टिक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. सुरुवातील प्लास्टिक बंदीला काहींनी विरोध सुद्धा दर्शवण्यास सुरुवात केला. मात्र तरीही चोरीछुप्या रितीने सुरुच ठेवण्यात आला आहे.