Representative Image (Photo Credits: Independent)

कोरोना व्हायरसच्या जाळ्यात आपला देश अधिकाधिक गुरफटून जाऊ नये यासाठी खबरदाराची उपाय म्हणून भारतात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. ऐन विद्यार्थ्यांच्या वार्षिक तसेच विविध बोर्डांच्या परीक्षेदरम्यान हा लॉकडाऊन मुळे विद्यार्थी पुरते गोंधळून गेले आहेत. यात महाराष्ट्रात काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत तर काही रद्दच केल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी खास 'ऑनलाईन अभ्यास' सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र याबाबत अनेक विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना अनेक शंका आहेत. यामुळे उद्या म्हणजेच 14 एप्रिल ला दुपारी 3 वाजता 'घरबसल्या शिक्षण' या विषयावर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा विशेष वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.

यासोबतच ऑनलाईन व्यावसायिक विकासासाठी देखील या वेबिनारमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. या वेबिनार मध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा

हेदेखील वाचा- Maharashtra SSC Board Exam 2020: दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा निर्णय

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउन येत्या 30 एप्रिल पर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला आहे. त्यामुळे विविध कार्यक्रम, शाळा, महाविद्यालयांच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर दहावीचा (SSC Board) शेवटचा म्हणजेच भूगोलाचा (Geography) पेपर रद्द करण्यात आल्याचा निर्णय महाराष्ट्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी घेतला आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना मूल्यमापन करुन गुण देण्यात येणार आहेत. तर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात यावा अशी मागणी केली होती.