Ashadhi Wari Toll Free: पंढरपुरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंढरपुरमध्ये दाखल होण्यासाठी जसजशा पालख्या पुढे सरकत आहेत. तसतसे राज्य सरकार वारकऱ्यांच्या हिताचा विचार करत असल्याचे दिसत आहे. कारण पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दाखल होणाऱ्या राज्यातील प्रत्येत वारकऱ्याला व त्याच्या वाहनांना टोल माफी(Toll Free) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा जीआरही काढण्यात आला आहे. त्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Wari)पंढरपुरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी मानली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यभरातील विठुरायांना सध्या आषाढी एकादशीचे वेध लागले आहेत. पंढपुरला विठुरायांच्या भेटीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. अशातच राज्य सरकारने मोठा निर्णय घेत पंढरपुरला जाणाऱ्या वाहनांना टोल माफ केले आहेत.
पंढपुरमध्ये १७ जुलै रोजी राज्यासह आजूबाजूच्या राज्यातून लाखो भाविक पंढरपुरमध्ये दाखल होतील. या सर्व वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तीन जुलैपासून ते 21 जुलै पर्यंत ही टोलमाफी असणार आहे. अक्षय महाराज भोसले यांनी याबाबतची माहिती दिली आहे.