Toddler Dies Dog Attack: कुत्र्याच्या हल्ल्यात साडेतीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू; छत्रपती संभाजी नगर येथील घटना
Toddler | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात (Dog Attack) लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. मुलगा केवळ साडेतीन वर्षांचा होता. धनराज पांडुरंग सरोदे असे त्याचे नाव आहे. पिसाळलेल्या एका कुत्र्याने त्याच्यावर 22 दिवसांपूर्वी हल्ला केला होता. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, 22 दिवस त्याची मृत्यूशी चाललेली झुंज अखेर अयशस्वी ठरली. या मुलावर सोमवार (20 फेब्रुवारी) रोजी कुत्र्याने हल्ला केला होता.

पिसाळलेल्या कुत्र्याने धनराज पांडुरंग सरोदे याच्या चेहऱ्यावर चावा घेत गंभीर जखमा केल्या होत्या. धरनाज हा आई सुरेखा यांच्यासोबत शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. यावेळी कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात धनराज प्रचंड जखमी झाला. त्याला वैद्यकीय उपचारासाठी तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी धनराज याच्यावर उपचार करत रेबिज आणि टीटीचे इंजेक्शन दिले. त्याच्यावर पुढेही उपचार सुरु राहिले. मात्र, डॉक्टरांच्या उपचारांना यश येऊ शकले नाही. (हेही वाचा, Aurangabad Crime: कुत्रा भुंकल्याने संतापला शेजारी, रागाच्या भरात फावडा डोक्यात घालत केली हत्या)

कुत्र्याने कडकडून घेतलेल्या चाव्यात धनराज याच्या चेहऱ्यावर गालावर, मानेवर आणि शरीराच्या इतरही भागावर जखमा झाल्या. त्यामुळे धनराज याला प्रचंड त्रासही होत होता. त्याच्यावर उपचार करुनही फरक पडत नव्हता. त्यामुळे त्याला घरी घेऊन जावे असा सल्ला त्याच्या पालकांना दिला होता.