Tiware Dam Incident: मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर तिवरे धरणफुटीमुळे उद्धवस्त झालेले गाव दत्तक घेणार
तिवरे धरणफुटी (फोटो सौजन्य-फेसबुक)

Tiware Dam Incident:  रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणफुटीमुळे जवळजळ 20 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना काही दिवासांपूर्वी घडली होती. तसेच या प्रकरणाची चौकशी करावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले होते. परंतु आता धरफुटीच्या प्रकारमुळे उद्धवस्त झालेले गाव मुंबईतील (Mumbai) श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास (Siddhivinayak Mandir Nyas) दत्तक घेणार असल्याची माहिती मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी दिली आहे. तर रत्नागिरी मधील आमदार उदय सामंत यांनी तिवरे गाव दत्तक घ्यावे अशी विनंती सिद्धिविनायक मंदिराकडे केली होती.

तसेच आदेश बांदेकर यांनी असे म्हटले आहे की, तिवरे धरणफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. तसेच 20 पेक्षा अधिक जणांचा नाहक बळी यामध्ये गेला आहे. परंतु आता या गावाचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचा निर्णय सिद्धिविनायक मंदिराने घेतला आहे. यासाठी मंदिराकडून भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. (Tiware Dam Incident: तिवरे धरणफुटी दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृतदेह हाती, 24 जण वाहून गेल्याची शक्यता, विरोधकांनी धरला आक्रमक सूर)

राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तिवरे धरण भरुन वाहू लागलं. त्यानंतर धरणाला भगदाड पडत असल्याचे निर्दशनास येताच गावकऱ्यांना खबरदारीचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्यानंतर तासाभरातच गावांमध्ये पाणी शिरले आणि त्यात घरांसह माणसे देखील वाहून गेली. या दुर्घटनेवरुन विरोधक आक्रमक झाले होते. तर सरकारवच हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.