आजकाल सोशल मीडियामध्ये अनेक अॅप्सचा धुमाकूळ आहे. तरूणाईला सध्या वेडं लावणारं अॅप म्हणजे टिकटॉक (TikTok). नुकतीच मुंबईतील एका महिलेने बॉम्बे हाय कोर्टात (Bombay High Court) टिकाटॉक विरोधात याचिक दाखल करून त्यावर बंदीची मागणी केली होती. मात्र आज मुंबई हाय कोर्टाने टिकटॉकवर बंदी घालण्यासाठी तातडीची सुनावणी घेण्यास नकार देत नियमित सुनावणीनुसार निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे. टिकटॉक अॅपवर बंदी घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; मुलांवर वाईट संस्कार होत असल्याचा केला दावा.
टिकटॉक हे एक लोकप्रिय व्हिडिओ अॅप असून दिवसेंदिवस त्याच्याबद्दलची क्रेझ वाढत आहे. हे मुलांसाठी अपायकारक आहे. या अॅपमुळे चिमुकल्यांवर वाईट परिणाम होत असल्याचं सांगत हीना दरवेश या गृहिणीने मुंबई हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. तसेच या अॅपमुळे जगभरात आपल्या देशाची प्रतिमा झाली आहे. असेही सांगण्यात आले आहे. सामान्य व्हिडिओंप्रमाणेच टिकटॉकवर अश्लिल व्हिडिओदेखील अपलोड केले जातात.ते संस्कारांच्या दृष्टीने लहान मुलांसाठी धोकादायक असल्याने त्यावर बंदीची मागणी आता जोर धरत असल्याचं समोर आलं आहे.
दरवेशी यांनी 11 नोव्हेंबरला मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून सोमवार (18 नोव्हेंबर) दिवशी त्याच्या प्रती आल्या. मुंबई प्रमाणेच काही महिन्यांपूर्वी मद्रास हाय कोर्टातदेखील अशाप्रकारे याचिका दाखल करून टिक टॉकवर बंदीची मागणी केली होती.
टिक टॉक हे 'बाईट डान्स' कंपनीचं सोशल मीडीया अॅप असून स्मार्टफोनद्वारा तुम्ही त्याच्या मदतीने तुम्ही मजेशीर व्हिडिओ बनवू शकता. ते शेअर करू शकता. ऑक्टोबर 2018 मध्ये अमेरिकेमध्ये 'टिकटॉक' हे सर्वाधिक डाऊनलोड केले गेले होते.