Mumbai: वायरने गळा दाबून प्रियकराने केला प्रियसीचा खून, मृतदेह फेकला समुद्रात, आरोपीला पोलिसांकडून अटक
Murder | (Photo Credits: PixaBay)

गोरेगाव (पश्चिम) (Goregaon) येथील प्रेम नगरमध्ये बेकरी चालवणाऱ्या 23 वर्षीय तरुणाला 18 वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. वर्सोवा बीचवर (Versova beach) गुरुवारी मुलीचा मृतदेह आढळून आला. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला, त्यानंतर आरोपी मोहम्मद अन्सारी याने मृत सोनम शुक्लाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून नदीत फेकून दिला. मात्र, तिचे लैंगिक शोषण झाले नाही. चौकशीत अन्सारीने सोनमची हत्या केल्याची कबुली दिली. घटनेच्या वेळी त्याचे आई-वडील आणि भावंडे घरी नव्हते. अन्सारीने सांगितले की, त्याने आधी सोनमचा केबल वायरने गळा दाबून खून केला आणि नंतर तिचे हात पाय बांधून तिचा मृतदेह एका गोणीत भरला. त्यानंतर तो आपल्या स्कूटरवरून नदीवर गेला आणि तेथे त्याने मृतदेह टाकला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, टीमने स्थानिक लोकांमार्फत अन्सारीची माहिती मिळवली आणि त्याची चौकशी केली, त्यानंतर त्याने सोनमला ओळखत असल्याची कबुली दिली आणि नंतर आपला गुन्हा कबूल केला.

वर्सोवा बीचवर सापडला मृतदेह

गुरूवारी संध्याकाळी सोनम शुक्लाचा मृतदेह वर्सोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर पोलिसांना सापडला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, डीसीपी (झोन IX) मंजुनाथ सिंह यांनी वर्सोव्याचे वरिष्ठ निरीक्षक सिराज इनामदार, निरीक्षक कौस्तुभ मितबावकर आणि डिटेक्शन स्टाफच्या पथकाला तपास करण्याचे निर्देश दिले. पथकाने पीडितेच्या पालकांची माहिती गोळा केली, त्यांनी 25 एप्रिल रोजी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांना ओळखत असून दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे टीमला समजले.

पालकांनी बेपत्ती असल्याची केली तक्रार

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 25 एप्रिल रोजी पीडित मुलगी दुपारी 4 वाजता शिकवणी वर्गासाठी गेली होती, परंतु ती वर्गात पोहोचली नाही. पोलीस चौकशीत ही मुलगी घरातून बाहेर पडून शेजारील तिच्या मैत्रिणीच्या (मुलीच्या) घरी गेली होती आणि रात्री नऊच्या सुमारास घरातून परत आल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. रात्री 11 वाजल्यानंतर तीचा मोबाईल बंद होता. यानंतर तिच्या पालकांनी बेपत्ता तक्रार दाखल केली.

वडिलांनी मृतदेहाची ओळख पटवली

सोनमच्या वडिलांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, 'जेव्हा सोनम रात्री 9.30 पर्यंत घरी परतली नाही, तेव्हा मी तिला फोन केला आणि तिची चौकशी केली. माझ्या मुलीने मला सांगितले की ती काही वेळात घरी पोहोचेल. ती तिच्या मैत्रिणीच्या घरी आहे, पण ती रात्री 11.30 पर्यंत पोहोचली नाही, तेव्हा मी काळजीत पडलो आणि तिला पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचा मोबाईल बंद होता. नंतर कळलं की माझ्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

त्यांनी सांगितले की, पोलिसांनी त्यांना एका मुलीच्या खराब झालेल्या मृतदेहाचे फोटो पाठवले. तो मृतदेह ओळखण्याच्या स्थितीत नव्हता. म्हणून, आम्हाला कूपर हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगण्यात आले, जिथे आम्ही तीला ओळखले. वर्सोवा समुद्रकिनाऱ्याजवळ तीचा मृतदेह एका गोणीत सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. (हे देखील वाचा: Nagpur Murder: लग्नात नाचताना झाली धक्काबुक्की, अल्पवयीन तरुणाने चाकूने भोसकून घेतला जीव)

मारेकऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे

वडील म्हणाले, 'माझ्या मुलीला डॉक्टर व्हायचे होते. आम्ही तिचा 18 वा वाढदिवस फेब्रुवारीमध्ये साजरा केला आणि तिला दोन महिन्यांनी NEET परीक्षेला बसायचे होते. ती दररोज 7 ते 8 तास अभ्यास करायची.'' या हत्येमध्ये सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले. त्याचवेळी सामाजिक कार्यकर्त्या सरोज गुप्ता यांनी पोलिसांवर मुलीच्या पालकांचा छळ केल्याचा आरोप केला आहे. “अपहरणाचा गुन्हा नोंदवण्याऐवजी गोरेगाव पोलिसांनी हरवल्याची तक्रार केली आणि उशीरा कारवाई केली. मुलीच्या आई-वडिलांचा पोलिस ठाण्यात छळ करण्यात आला.