Close
Search

नाशिक: त्र्यंबकेश्वर येथील धबधब्यात 3 विद्यार्थी बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांचा शोध सुरु

पर्यटनासाठी गेलेले 3 विद्यार्थी दुगारवाडीच्या (Dugarwadi) धबधब्याखाली बुडाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) तालुक्यात घडली. बुडालेल्या तिघांपैकी एका मुलीचा मृतदेह आज बुधवारी सकाळी मिळाला असून दोघांचा शोध घेतला जात आहे.

महाराष्ट्र Ashwjeet Jagtap|
नाशिक: त्र्यंबकेश्वर येथील धबधब्यात 3 विद्यार्थी बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांचा शोध सुरु
Drowning | Representational Image| (Photo Credits: PTI)

पर्यटनासाठी गेलेले 3 विद्यार्थी दुगारवाडीच्या (Dugarwadi) धबधब्याखाली बुडाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) तालुक्यात घडली. बुडालेल्या तिघांपैकी एका मुलीचा मृतदेह आज बुधवारी सकाळी मिळाला असून दोघांचा शोध घेतला जात आहे. तेलंगणा राज्यातील काही विद्यार्थी औरंगाबाद येथील कृषी महाविद्यालयात श्क्षिण घेत आहेत. तसेच हे विद्यार्थी पर्यटनासाठी म्हणून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे गेले होते. परंतु, रात्री झाली तरी परतल्या नसल्याने महाविद्यालयातील शिक्षकांनी नाशिक पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी आपली शोध मोहीम सुरु केली होती.

अनुषा (21), रघुवंशी (21), आणि कोटी रेड्डी (20) असे धबधब्यात बुडलेल्या तिन्ही विद्यार्थ्यांचे नाव आहे. तिघही विद्यार्थी तेलंगणा राज्यातील औरंगाबाद येथील कृषी महाविद्यालयात श्क्षिण घेत आहेत. अनुषा, रघुवंशी आणि कोटी रेड्डी यांच्यासह 6 विद्यार्थ्यांनी बुधवारी सायंकाळी 5 वाजता त्र्यंबकेश्वर येथील दुगारवाडीच्या धबधब्याला भेट दिली होती. सायंकाळी उशीर झाल्याने तसेच पाण्याचा अंदाज येत नसल्याने काही विद्यार्थी माघारी फिरले. परंतु, रात्री झाली तरीदेखील अनुषा, रघुवंशी आणि कोटी रेड्डी परतले नसल्याने त्यांच्या शिक्षिकांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांना अनुषा हीचा मृतदेह सापडला असून रघुवंशी आणि कोटी रेड्डी यांचा शोध सुरु आहे. हे देखील वाचा- अकोला: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला 7 वर्षाची शिक्षा

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्यात बुडालेल्या तिघांच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली असल्याचे त्र्यंबकेश्वर पोलीसांनी सांगितले. बेपत्ता झालेल्या दोघांचा स्थानिक नागरीकांसह त्र्यंबेकश्वर पोलीस शोध घेत आहेत.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change

चर्चेतील विषय

ICC World Cup 2023Coranavirus in MaharashtraFact checkSharad PawarCM Eknath ShindeCoronavirusकोविड 19 लस