Photo Credit - X

Building slab collapsed in Thane: ठाणे(Thane)मधील कळवा(Kalwa)येथे इमारतीचा स्लॅब कोसळल्याची (Building slab collapsed) घटना बुधवारी रात्री घडली. या दुर्घटनेत 3 जण जखमी झाले आहेत. मुंबई आणि परिसरात पावसाने जोर धरताच पडझडीच्या घटना सरु झाल्या आहेत. कळव्यातील ओम कृष्णा अपार्टमेंटमध्ये (Om Krishna Apartment) ही घटना घडली. तिसऱ्या मजल्यावरील इमारतीचा स्लॅब हा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर कोसळला. दुसऱ्या मजल्यावरील कुटुंब जेवण करत असतानाच इमारतीचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनाग्रस्त इमारतीत आणखी काही कुटुंबं राहत होती. त्यांनाही सुरक्षित रित्या इमारतीतून बाहेर काढण्यात आले आहे.

ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला-

दरम्यान, ही इमारत 30 ते 35 वर्ष जुनी असल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे. महापालिकेने सदर इमारत रिकामी केली आहे.