Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

Mumbai-Bengaluru Highway  च्या पुणे सातारा महामार्गावर Bhumkar Chowk मध्ये  आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ट्रक डायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने तो पॅसेंजर बस सह इतर अवघड वाहनांवर आदळला. या अपघातात 3 जण ठार झाले असून 10-12 जण जखमी आहेत. मृतांची नावं जगदीश कुमार (50), नितेश कांबळे (28), मोहम्मद सुलतान (26) यांचा समावेश आहे. ताबा सुटलेला ट्रक ड्रायव्हर गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जखमी ट्र्क ड्रायव्हरचा ट्रक हा मध्य प्रदेशातील रजिस्ट्रेशनचा आहे. मुंबई कडे येताना पुण्याजवळ अपघात झाला आहे. एका चालत्या बस वर तो आदळला. यामध्ये बस महामार्गावर काम करत असलेल्या एका Stationary Mixer Truck वर आदळला. हे देखील वाचा: Solapur Accident: सोलापूर मध्ये बार्शी - कुर्डुवाडी रोडवर ट्रॅक्टर आणि लक्झरी बसचा अपघात; 2 ठार, 10 जखमी .

ANI Tweet

जगदीश कुमार हा मिक्सर ट्रकचा ड्रायव्हर होता तर कांबळे आणि सुल्तान हे कामगार साईट वर काम करत होते. मध्य प्रदेशचा ट्रक पुढे दुसर्‍या एका महाराष्ट्रात रजिस्टर असलेल्या ट्रक वर देखील आदळला. खोपोली पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल अमोल धायगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8-19 प्रवासी देखील यामध्ये जखमी झाले आहेत.

महाराष्ट्रातील रजिस्टर ट्रक मध्ये ड्रायव्हर आणि क्लिनर यांना दुखापत झाली आहे. त्यांना नजिकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर पुणे, पनवेल आणि खोपोली येथील विविध रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.