Ahmednagar Suicide: एकाच कुटुंबातील तिघांची गळफास लावून आत्महत्या, अहमदनगर येथील धक्कादायक घटना
Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोरोना महामारीमुळे (Coronavirus) अनेकांनी नोकरी गमावली असून संपूर्ण देशात बेरोजगारीचे संकट उद्धभवले आहे. यातच अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील केडगाव देवीरोड (Kedgaon Devi Road) येथील अर्थवनगर येथे एकाच कुटुंबियातील तीन जणांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. ही घटना आज (6 सप्टेंबर) सकाळी घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. मृतांमध्ये एक दाम्पत्य आणि त्यांच्या दहा वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. आर्थिक अडचणीतून त्यांनी आपली जीवन यात्रा संपवल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.

संदिप दिनकर फाटक (वय, 40) पत्नी किरण संदिप फाटक आणि त्यांची मुलगी मैथिली संदिप फाटक अशी मृतांची नावे आहेत. मृतक हे केडगावमधील मोहिनीनगर भागात राहत असून संदीप हे व्यावसायिक होते. मात्र, फाटक दाम्पत्याला गेल्या काही दिवसांपासून आर्थिक चणचण भासत होती. यामुळे फाटक दाम्पत्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फाटक दाम्पत्याने त्यांची मुलगी मैथलीला गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर त्यांनीही गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाईट नोट सापडली आहे. या सुसाईट नोटच्या आधारे पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. हे देखील वाचा- Pune Gang Rape: धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर 8 जणांचा सामूहिक बलात्कार; शहरभर फिरवत केला अत्याचार, आरोपींना अटक

अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी एका विवाहित महिलेने चार वर्षाच्या मुलीसह आत्महत्या केली होती. श्रीरामपूरच्या टाकळीमिया येथे ही घटना घडली आहे. आजारपणाला कंटाळून संबंधित महिलेने मुलीसह विहिरीत उडी घेतली होती. मायलेकीच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.