DCM Devendra Fadnavis Receives Death Threat: सोशल मीडियाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी, गुन्हा दाखल
Devendra Fadnavis | (Photo Credit - Twitter/ANI)

DCM Devendra Fadnavis Receives Death Threat: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्या प्रकरणी आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी अज्ञाताविरुध्दात गुन्हा दाखल केला आहे. दोन जातींमध्ये असंतोष पसरवण्याचा प्रयत्न  आणि दंगा भडकवण्याच्या उद्देशाने चिथावणीखोर तसेच शांतता भंग होईल असे विधान आरोपीने केले आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. (हेही वाचा-निलेश राणे यांची पुण्यातील मालमत्ता कर न भरल्याने सील; महानगरपालिकेची कारवाई)

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना पदाधिकारी अक्षय पानवलकर यांच्या तक्रारीवरून सांताक्रुझ पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 153, (अ), 500, 505 (3), 506 (2) 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, मंगळवारी संध्याकाळी एक मुलाखत घेणारा एका व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हत्येबाबत वक्तव्य करत होता. तसेच दोन जातींमध्ये वाद होणार असल्याचा वक्तव्य केला. सोबत फडणवील यांचीही बदनामी झाली. हा व्हिडिओ युट्यूब, फेसबूक आणि ट्यूटरवर व्हायरल झाला होता.

योगेश सावंत 7796 या फेसबुक अंकाऊटवर अपलोड केला होता. तसेच हाच व्हिडिओ एका ट्युटर यूजरने ट्वीटरवर अपलोड केला होता. पोलिसांनी तपासणी करत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. सांताक्रुझ पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहे.