महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019: Sharad Pawar यांना पाऊस पावला; वाचा त्या पावसातल्या सभेबद्दल
शरद पवार सातारा सभा (Photo Credit : Facebook)

आज सकाळी 8 वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अंतिम निकाल जरी अजून आला नसला तरी प्राथमिक कल हाती आले आहेत. त्यानुसार भाजप आणि शिवसेनेने बाजी मारली असली तरी राष्ट्रवादीने मात्र घवघवीत यश मिळवलं आहे.

एक्सिट पोलला साफ खोटं ठरवत राष्ट्रवादी काँग्रेस 50 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकतीच पत्रकार परिषद देखील घेतली.

पण राष्ट्रवादीचं हे यश पावसाला देखील तितकंच जातं आणि म्हणूनच शरद पवार यांनी पावसामध्ये घेतलेली सभा पुन्हा चर्चेत आली आहे.

19 ऑक्टोबर रोजी शरद पवारांची साताऱ्यामध्ये प्रचारसभा झाली होती. सभा सुरु असताना अचानक जोरदार पाऊस पडू लागला. मात्र पावसाळा न जुमानता पवारांनी आपला भाषण सुरु ठेवलं. जवळजवळ पाच मिनिटे ते भर पावसामध्ये भाषण करत राहिले. आणि पवारांचा भर पावसात भाषण करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच शनिवारी अगदी सकाळपासूनच #SharadPawar हा हॅशटॅग ट्विटवर पहिल्या क्रमांकावर ट्रेण्ड होताना दिसत होता. अनेक नेटकऱ्यांनी शरद पवार व त्यांच्या कामावरील निष्ठेला सलाम केल्याचे पहायला मिळाले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: धनंजय मुंडे, अजित पवार यांच्यासह पहा 288 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

त्यामुळे आताच्या निकालाचे कल पाहता याच सभेमुळे महाराष्ट्रातील वातावरण फिरलयं असं दिसून येतंय.

शरद पवारांच्या या सभेनंतर आदित्य ठाकरे, आशिष शेलार यांनी देखील भर पावसात आपला प्रचार केला होता.